Home Top News अदानी फाउंडेशनचा पुढाकार; मका लागवड व मुरघास निर्मितीला प्रोत्साहन

अदानी फाउंडेशनचा पुढाकार; मका लागवड व मुरघास निर्मितीला प्रोत्साहन

0
49

तिरोडा: अदानी फाऊंडेशन, तिरोडा यांच्या वतीने परिसरातील शेती व पशुधनाच्या विकासासाठी एक महत्त्वाकांक्षी पाऊल उचलण्यात आले आहे. अदानी पॉवर प्रमुख मयंक दोशी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
या उपक्रमाला अदानी फाउंडेशन प्रमुख बिमूल पटेल यांचे सक्रिय सहकार्य लाभले आहे. तालुक्यातील ३०० शेतकऱ्यांच्या ५०० एकर शेतीमध्ये मका लागवड व मुरघास निर्मिती करिता विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे.या उपक्रमांतर्गत, फाउंडेशनतर्फे सहभागी शेतकऱ्यांना खालील सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत:
तांत्रिक मार्गदर्शन: मका लागवडीपासून ते मुरघास निर्मितीच्या संपूर्ण प्रक्रियेसाठी तज्ज्ञांचे सविस्तर आणि अद्ययावत तांत्रिक मार्गदर्शन पुरवले जात आहे.
बियाणे उपलब्धता: उच्च प्रतीच्या मक्याच्या जातींचे दर्जेदार बियाणे फाउंडेशनकडून उपलब्ध करून दिले जात आहे, जेणेकरून उत्पादकता आणि मुरघासाची गुणवत्ता वाढण्यास मदत होईल.
हा उपक्रम शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर ठरणार असून, त्यांना दुग्ध व्यवसायासाठी वर्षभर हिरवा चारा उपलब्ध होऊन त्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होण्यास मदत होईल.
अदानी फाउंडेशन, तिरोडा हे या माध्यमातून परिसरातील शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन, शेतकऱ्यांना सक्षम बनविण्याच्या आपल्या ध्येयावर कटिबद्ध आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here