अखेर पंतप्रधानांनी 77 दिवसांनी सोडले मौन

प्रियांका गांधींची मोदींवर टीका

0
47

नवी दिल्ली ( New Delhi): मणिपूरमध्ये महिलांबरोबर घडलेल्या घटनेनंतर देशभरातून संतापाची लाट समोर येत आहे. मणिपूर (Manipur) दोन महिन्यांपासून जळत असताना मोदी 77 दिवसांपासून मौन बाळगून होते. त्यावरून काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांनी पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. नी यावर बोलले आणि त्यातही राजकारण केले असे प्रियांका गांधी म्हणाल्या.

मेईतेई आणि कुकी यांच्यातील वाद विकोपाला पोहोचल्याने सुमारे दोन महिन्यांपासून मणिपूरमध्ये हिंसाचार सुरू आहे. त्यात बुधवारी महिलांची धिंड काढल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर देशभरात एकच संतापाची लाट उसळली. त्यानंतर गुरुवारी संसदेचे अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूरबाबत निवेदन केलं. त्यावरून प्रियंका गांधींनी मोदींवर टीका केली आहे.

“दोन महिन्यांपासून संपूर्ण मणिपूर राज्य हिंसाचाराच्या आगीत जळत आहे. लोकांची घरे जाळली जात आहे. एकमेकांच्या हत्या केल्या जात आहेत. मुलांच्या डोक्यावर छत राहिले नाही. असे असताना आपले पंतप्रधान 77 दिवस काहीही बोलले नाही. कारवाई सोडाच पण एक शब्दही काढला नाही. एक अत्यंत भयावह व्हिडिओ व्हायरल झाल्याने नाईलाजाने त्यांना बोलावे लागले. त्यामुळे नाइलाजाने ते एक वाक्य बोलले आणि त्या एका वाक्यातही त्यांनी राजकारण केले. त्या वाक्यातही त्यांनी ज्या राज्यात विरोधी पक्षांची सरकारे आहेत, त्यांची नावे त्यांनी घेतली,” असे प्रियांका गांधी म्हणाल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here