Home निवडणूक 2025 डिगडोह नगरपरिषद निवडणूक : डिगडोह जागृती मंच समर्थित उमेदवाराना उत्स्फूर्त प्रतिसाद

डिगडोह नगरपरिषद निवडणूक : डिगडोह जागृती मंच समर्थित उमेदवाराना उत्स्फूर्त प्रतिसाद

0
28

नागपूर : यंदाच्या नगर परिषद निवडणुकीत डिगडोह जागृती मंच समर्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे उमेदवार रिंगणात असून, मंचाचे सदस्य जितेंद्र मेश्राम यांच्या नेतृत्वात ही निवडणूक जोमात लढवली जात आहे. नगराध्यक्ष पदासाठी सौ. संगीता नरेंद्र मेश्राम या प्रभावीपणे दौरे करत असून त्यांना नागरिकांचा वाढता पाठिंबा मिळत आहे. त्यांच्या सविस्तर वचननाम्याचे देखील मतदारांमध्ये स्वागत होत आहे.

औद्योगिकदृष्ट्या वेगाने प्रगत होणाऱ्या एमआयडीसी परिसरातील डिगडोह देवी ग्रामपंचायतीचे नगरपरिषदेमध्ये झालेले रूपांतर हे स्थानिक विकासाच्या दृष्टीने मोलाचे पाऊल ठरले आहे. मागील अडीच–तीन वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रलंबित असल्याने अनेक विकासकामांना ब्रेक लागला होता. मात्र आता निवडणुकीचे वारे लागल्याने नागरिकांच्या आशा-अपेक्षा पुन्हा बहरल्या आहेत.

डिगडोहच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत तरुण, महिला आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येत ‘डिगडोह जागृती मंच’ ची स्थापना केली. या मंचाने केलेल्या विविध निवेदन, आंदोलने आणि लोकसंग्रहामुळे नागरिकांच्या मनात या मंचाबद्दल आत्मीयता आणि विश्वास निर्माण झाला आहे.

‘एक कॉल – प्रॉब्लेम सॉल्व्ह ही अभिनव संकल्पना मतदारांच्या पसंतीस उतरली आहे. कोणतीही समस्या असो—पाणी, कचरा, रस्ता किंवा इतर प्रश्न—एक फोन केला की मी व माझी संपूर्ण टीम आपल्या दारात हजर राहून समस्या तत्काळ सोडवू, असे वचननाम्यात सांगण्यात आले आहे. निवडणुकीच्या निकालाच्या दुसऱ्या दिवसापासून रस्ते, पाणी, गटारे, पथदिवे यांसारख्या मूलभूत कामांना गती देण्यात येईल. गावात गटार रेषेचा मोठा प्रश्न तातडीने सोडवला जाईल. नियमित कचरा उचल, स्वच्छता उपक्रम, उद्याने व खेळाची मैदाने उभारली जातील.

डिगडोह जागृती मंचच्या माध्यमातून सुरू असलेला विकासाचा हा प्रवास आणि सौ. संगीता मेश्राम यांचे स्पष्ट, सर्वसमावेशक वचननामा यामुळे डिगडोहच्या मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. आगामी निवडणूक डिगडोहच्या उज्ज्वल भविष्यासाठी निर्णायक ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here