बीडचे नवे सीएस सुरेश साबळे; गितेंची हकालपट्टी

0
53
-सतत येणाऱ्या तक्रारीमुळे पदावरुन हालवले
-सर्वसामन्यांतुन निर्णयाचे स्वागत

प्रारंभ वृत्तसेवा

बीड : बीड जिल्हाशल्यचिकित्सक म्हणून माजलगावचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.सुरेश साबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर सुर्यकांत गित्ते यांची हकालपट्टी करत त्यांना लोखंडी सावरगाव येथे पाठवले आहे.  जिल्हा रुग्णालयातील वाढत्या तक्रारीमुळे गित्ते यांच्या बदलीचे आदेश आरोग्य संचालिका साधना तायडे यांनी दिले.

जिल्हारुग्णालय येथे रुग्णांना विविध समस्यांचा सामना करावा लागत होता. यासह पुर्वीचे सीएस गित्ते यांचेे जिल्हारुग्णालयातील यंत्रणेवर जास्त नियंत्रण नव्हते, यामुळे जिल्हा रुग्णालयात येणाऱ्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत होता. याच तक्रारीमुळे त्यांची सीएस पदावरुन हकालपट्टी करण्यात आली. त्यांच्या जागी माजलगाव येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ.सुरेश साबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. सुरेश साबळेे आता सीएस पदावर कशा प्रकारे काम करतात हे पाहावे लागणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here