मुख्यमंत्र्यांनी नियोजित सर्व कार्यक्रम रद्द करुन घेतली शरद पवारांची भेट

0
34

प्रारंभ वृत्तसेवा

मुंबई :  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे ब्रीच कँडी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मागील तीन दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करुन शरद पवारांची भेट घेतली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (ता. 04) मुंबई व ठाण्यातील नियोजित सर्व कार्यक्रम रद्द करुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे तब्येतीची विचारपूस करण्यासाठी ब्रिज कँडी हॉस्पिटल मध्ये जाऊन पवारांची भेट घेतली.   उद्या (ता. 05) शरद पवार शिर्डी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिबिराला संबोधन करण्यासाठी हेलिकॉप्टरने जाणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here