कोरोना वाढत असल्यामुळे या तालुक्यात कडक निर्बंध!

0
50

सकाळी सात ते दुपारी 12:30 पर्यंतच सुट

प्रारंभ वृत्तसेवा

बीड : जिल्ह्यातील काही तालुक्यात परत कोरोनाची संख्या वाढू लागली आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाच्या वतिने विविध कडक निर्बंध लागु करण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यातील शिरुर तालुक्यात जास्त रुग्ण वाढत असल्यामुळे शिरुर तालुक्यात कडक निर्बंध लागु करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी यांनी आज घेतला.

शिरुर तालुक्यातील कोरोनाची संख्या आटोक्यात आणण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी तेथील नियम अजून कडक केले आहेत. सोमवार ते शुक्रवार सकाळी 7:00 ते दुपारी 12:30 पर्यंत आवश्‍यक सेवा सोडता इतर आस्थापने उघडे राहतील. 12:30 नंतर आवश्‍यक सेवा सोडता इतर सर्व आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. यासह शनिवार,रविवार हे दोन दिवस आवश्‍यक सेवा सोडता इतर सर्व बंद राहील.विनाकारण बाहेर पडल्यास नियमानुसार कारवाया करण्याचे आदेश सुद्धा संबंधित विभागास देण्यात आलेले आहेत. वरील आदेश 22/7/2021 सकाळी 7:00 पासून लागु होणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here