लिंबागणेश मध्ये राजेंद्र मस्केंचे कमळ फुलणार …!

0
45

लिंबागणेश जिल्हापरिषद गट ओपन- कार्यकर्त्यांचा जल्लोष

बीड प्रतिनिधी : आज जिल्हापरिषद गटांच्या 69 जागांसाठी आरक्षण सोडत जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली. 27 टक्के ओबीसी, 13 टक्के मागासवर्गीयांना आरक्षण मिळाले असून 21 ओबीसी महिलांना निवडणुकीत संधी मिळणार आहे. बीड तालुक्यात फक्त लिंबागणेश आणि नेकनूर या दोन गटातच थेट पुरुषांना संधी मिळणार आहे. लिंबागणेश गट ओपन झाल्यामुळे राजेंद्र मस्के यांच्या कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त करत, पिंपळवाडी चौक येथे जल्लोष केला.
याप्रसंगी
शरद बडगे विशाल पाखरे शंकर तुपे बद्रीनाथ जटाळ, महेश सावंत,रवींद्र कळसाने,कृष्णा बहिरवाळ,दिलीप डोंगर,बिबीशन ठोकळ,सोमीनाथ निकाळजे, बाबासाहेब निकाळजे, आबा येळवे,ईश्वर पाहुणे,पंकज माने,बाबुराव कदम, ,सतीशराव कळसुले,अंकुश खटाने,दिलीप बहिरवाल,विलास बहिरवाल , विष्णू पाखरे ,महादेव गायकवाड नंदलाल पाखरे दत्ता गायकवाड राजाभाऊ पाखरे राजेभाऊ थोरात शिवाजी तुपे शिवप्रसाद कळसाने रवींद्र निकाळजे अमोल तुपे अशोक ठोकळ लक्ष्मण कळसाने आदी उपस्थित होते.

भारतीय जनता पार्टीचे लोकप्रिय जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी यापूर्वी माळापुरी व लिंबागणेश गटात निवडणूक लढवून विजय प्राप्त केला. मागील निवडणुकीत लिंबागणेश गटामध्ये शिट्टी या चिन्हावार यशस्वीपणे निवडणूक लढवून विजय संपादन केला होता. लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांच्या विश्वासावर जिल्हापरिषेदच्या उपाध्यक्ष पदाची संधी मिळाली. दिलेला शब्द पूर्ण करायचा आणि हाती घेतलेले काम तडीस न्यायचे या जिद्दीमुळे लिंबागणेश गटातील प्रत्येक गावात विकासाची गंगा पोहोच केली. कधीही जातीय व पक्षीय भेद न मानता समोर आलेल्या व्यक्तीचे काम करत केवळ विकासाचे राजकारण केले.
आमदारालाही लाजवेल अशी विकास कामाची हातोटी मतदारांना अनुभवायास मिळाली. सत्ता असो अथवा नसो विकास कामात कधीही खंड पडू दिला नाही. लोकांच्या मागणीप्रमाणे विकास कामांना प्राधान्य दिले. पिंपळवाडी डोंगर पट्ट्यात रस्त्याचे जाळे निर्माण केले. लोकांचे सुख दु:ख, लग्नकार्य, धार्मिक उत्सव, दुष्काळ अथवा नैसर्गिक आपत्ती असो, राजेंद्र मस्केंचा मदतीचा हात गरजवंता पर्यंत पोहचला. घराघरात आणि मनामनात राजेंद्र मस्केंचे नाव कोरले आहे. पुन्हा एकदा राजेंद्र मस्केंना लिंबागणेश गटात संधी मिळावी अशी लोकांची इच्छा होती. आज लोकांची इच्छा पूर्ण झाली आणि लिंबागणेश गट ओपन झाला. आज लोकनेत्या पंकजाताई मुंडे आणि खा.डॉ. प्रितमताई मुंडे यांचे प्रेम, आणि समर्थ आधार असल्याने आगामी निवडणुकीत राजेंद्र मस्केंच्या माध्यमातून कमळ फुलणार यात शंका नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here