हर घर तिरंगा अभियानामध्ये जिल्ह्यात विविध उपक्रम  

0
43

माजलगाव, अंबाजोगाई येथे रॅली व तिरंगा ध्वजाचे वितरण

 शालेय विद्यार्थी , स्वयंसहाय्यता महिला बचत गटाच्या सदस्यांचा सहभाग

 

         बीड : महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) जिल्हा कार्यालय बीड अंतर्गत अंबाजोगाई लोकसंचलित साधन केंद्र, अंबाजोगाई येथे 12 व्या वार्षिक सभे प्रसंगी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्ताने आज 08 ऑगस्ट 2022 रोजी अंबाजोगाई येथे “हर घर तिरंगा” अभियान च्या जनजागृतीसाठी स्वयंसहाय्यता महिला बचतगटाच्या महिलांनी तिरंगा रॅलीची सुरुवात तहसीलदार  विपीन पाटील  यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी माविम चे जिल्हा समन्वय अधिकारी एस. बी. चिंचोलीकर उपस्थित होते. ही तिरंगा रॅली तहसील कार्यालय ते अनिकेत मंगल कार्यालय पर्यंत काढण्यात आली असे  विविध कार्यक्रम घेण्यात आले.

तसेच ग्रामपंचायत टाकरवन ता. माजलगाव येथील हर घर झेंडा अभियान अंतर्गत जि .प शाळा प्रभात फेरी, राष्ट्रगीत,व ग्रामस्थांना ग्रामपंचायत द्वारे ध्वज वाटप करण्यात आले. माजलगाव येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत आज 9 ऑगस्ट क्रांती दिन रोजी शालेय विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली ,

राजस्थानी विद्यालयात सामूहिक राष्ट्रगीत गायनाचे आयोजन करण्यात आले. त्या नंतर पंचायत समिती येथे राष्ट्र ध्वज वितरण करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here