मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी असलेल्या राष्ट्रवादीच्या (NCP) एका गटाने शुक्रवारी खातेवाटप जाहीर केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांच्या खात्यांच्या वाटपाची घोषणा केली आणि विद्यमान मंत्र्यांच्या खात्यांमध्येही काही बदल केले. यामध्ये अंतर्गत कुरघोडी दिसून आली. शिंदे आमदार अब्दुल सत्तार यांच्याकडून कृषी खाते काढून राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना देण्यात आले. मुंडे यांनी पदभार स्वीकारताच शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे.
मंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर मंत्री धनंजय मुंडे यांनी आज आढावा बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी मुंडे म्हणाले की, कृषिमंत्रिपदाची जबाबदारी माझ्यावर देण्यात आली आहे. साहजिकच शेती आणि माझे वेगळे नाते आहे. शेतकऱ्यांच्या बाबतीत काही चांगले करता येईल. आज माझा वाढदिवस आहे, त्यामुळे मी खूप आनंदी आहे. प्रथमच कृषिमंत्री झाल्यानंतर मी खूप आनंदी आहे. त्यानुसार आज आढावा बैठक घेतली.
आता मागेल त्याला शेततळे
आज शेतकरी अडचणीत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पाऊस कमी आहे. आजच्या आढावा बैठकीत चर्चा झालेले निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठेवण्यात येणार आहेत. सुरुवातीला लॉटरी पद्धतीने शेततळे आणि सिंचनाचे वाटप करण्यात आले. मात्र, आता मागेल त्याला शेततळे ही योजना असेल, असा महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
बोगस बियाणे कोणत्याही शेतकऱ्यापर्यंत पोहोचू नये. जर कोणी बोगस बियाणे विकत असेल तर कृषी विभाग त्यांचा बाजार उभा करेल. पावसाची परिस्थिती पाहता तो कुठे पडतो? कुठे जास्त पडतो. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचे कमीत कमी नुकसान होईल, याची काळजी सरकार घेईल, अशी आश्वासनही धनंजय मुंडे यांनी दिलं आहे.