गेवराईत अजुन एक लाचखोर पकडला!

0
2034
एका हजाराची लाच घेताना शाखा अभियंता एसीबीच्या जाळ्यात

प्रारंभ वृत्तसेवा

बीड : गेवराई येथील ग्रामीण पाणी पुरवठा उपविभागातील शाखा अभियंता एक हजाराची लाच घेताना सोमवारी (ता. 05) एसीबीच्या जाळ्यात आला.
शेख समद नूर मोहम्मद वय 57 असे लाच घेणाऱ्या शाखा अभियंत्याचे नाव आहे. ते गेवराई ग्रामिण पाणी पुरवठा उपविभागात शाखा अभियंता म्हणून कार्यरत होते. तक्रारदारांकडून नवीन सार्वजनिक शौच्छालयाच्या अंदाजपत्रकाची तांत्रिक मान्यता देण्यासाठी एक हजाराची मागणी केली होती. आज ती रक्कम घेताना शेख यांना एसीबीने ताब्यात घेतले. ही कारवाई पोलीस निरीक्षक राजकुमार पाडवी यांच्या टिमने केली. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here