पारगांव घुमराच्या विवेक वारभुवनचे पी. ई. संस्थेच्या स्पर्धेच्या करंडकावर नाव!

0
148

प्रारंभ वृत्तसंस्था

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या पी. ई. संस्थेच्या वतीने सन १९६० पासून आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली जाते. या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही स्पर्धा सिद्धार्थ महाविद्यालयाच्या (चर्चगेट,मुंबई) व्यवस्थापनाने आॅनलाईन घेतली .दोन फेरीत घेण्यात आलेल्या या स्पर्धेस विद्यार्थ्यांनी उदंड प्रतिसाद दिला. अंतिम फेरीत २० विद्यार्थ्यांमधून मुळ पारगाव (घुमरा), ता. पाटोदा येथील भूमिपुत्र ( सध्या वास्तव्य नवी मुंबई, कोपरखैराणे ) युवक व विवेकानंद वरिष्ठ महाविद्यालय चेंबूर मुंबईचा विद्यार्थी विवेक मधुकर वारभुवन याने प्रथम क्रमांक प्राप्त करुन गेल्या ६० वर्षांपासून सुरू असलेल्या या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती चषकावर आपले व आपल्या महाविद्यालयाचे नाव कोरले. विवेकानंद वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती डॉ. अनिता कन्वर व इतर गावकऱ्यांच्या वतीने अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here