दिलासादायक बातमी: ५२८ जणांनी केली कोरोनावर मात!

0
619

आता पर्यंत जिल्ह्यात ७२२ कोरोना बळी

प्रारंभ वृत्तसेवा

बीड : आज जिल्ह्यातील ५२८ जणांनी कोरोनावर मात केली. रुग्ण वाढत असल्यामुळे जिल्ह्याची चिंता वाढत जरी असली तरी बरी होण्याची संख्या वाढली असल्यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळत आहे.

जिल्ह्यात आजपर्यंत अनेकांनी कोरोनावर मात केली. बरे झालेल्या रुग्णांना रुग्णालयातुन सुट्टी देण्यात आली आहे. आज ५२८ जणांना सुट्टी देण्यात आली. आता पर्यंत जिल्ह्यात ७२२ जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. आता पर्यंत जिल्ह्यात ३४,०६१ जणांना कोरोनाची लागण झालेली आहे. यातील २९, ६०६ जणांनी कोरोनावर मात केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here