दिलासादायक बातमी: बीड जिल्ह्याला मिळणार दहा हजार रेमडेसिवीर!

0
569

जिल्ह्यात येणार दहा हजार रेमडेसीविर इंजेक्शन

– अँड. अजित देशमुख यांची माहिती

बीड ( प्रतिनिधी ) बीड जिल्ह्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत होता. त्यामुळे रुग्ण आणि रुग्णांचे नातेवाईक वैतागून गेले होते. ही इंजेक्शन एका डॉक्टर अधिकाऱ्याच्या वैयक्तिक संबंधातून आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या पुढाकारातून येत आहेत. जन आंदोलनाचे विश्वस्त अँड. अजित देशमुख यांनी ही माहिती दिली आहे.

कसलाही बडेजाव न करता जिल्हाधिकारी रवींद्र जगताप हे कोरोना काळात चांगले काम करत आहेत. त्यांनी आवश्यक तेवढी कठोर भूमिका घ्यावी. मात्र रुग्नसेवा चांगली हवी ,अशी ही जनतेची अपेक्षा आहे. जन आंदोलन या काळात पूर्णपणे प्रशासना बरोबर राहून काम पाहणार आहे.

मेडिकल दुकानदारांनी आणि यंत्रणेतील काही लोकांनी इंजेक्शनचा तुटवडा दाखवून लूटमार केल्याची तक्रार देखील गेल्या काही दिवसांपासून चालू होती. तरी देखील मेडिकल दुकानदार आपल्याकडे किती माल आहे, हे सांगायला तयार नव्हते. त्यामुळे हा मुद्दा वारंवार गाजत होता.

या पार्श्वभूमीवर जन आंदोलनाने आरोग्य विभागाकडे हा मुद्दा लावून धरला होता. या सर्व पार्श्वभूमीवर जिल्ह्यात दहा हजार इंजेक्शन येत असल्याने जिल्हावासीयांची त्रासातून सुटका होत आहे. रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने औषध विक्रेत्यांनी विक्रीकडे धंदा म्हणून न पाहता सेवा म्हणून पहावे.

रुग्णसेवेचे ही संधी आहे. दुर्दैवाने उद्भवलेल्या या परिस्थितीत चांगल्या प्रकारे रुग्णसेवा हवी. यासाठी सर्व यंत्रणेने जागरूक राहायला हवे. औषधी दुकानदाराच्या तक्रारी आल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची भूमिका आम्हाला घ्यावी लागेल. त्यामुळे दुकानदारांनी पेशंट आणि त्यांच्या नातेवाईकांकडे पारदर्शकतेने वागावे. अन्यथा त्यांच्या विरोधात देखील आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल, असेही अँड. अजित देशमुख यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here