5200 अहवालात 131 अहवाल पॉझिटिव्ह!

0
45

सात तालुक्यात दहा पेक्षाही कमी रुग्ण

प्रारंभ वृत्तसेवा

बीड : जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्या कमी जास्त होताना दिसत आहे. आज प्राप्त झालेल्या अहवालात जिल्हाभरात 131 नव्या रुग्णांची भर पडली. दिलासादायक म्हणजे जिल्ह्यातील सात तालुक्यात दहा पेक्षाही कमी रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात रुग्ण संख्या कमी जरी होत असली तरीही अजुन काही दिवस सर्वांना जिल्हा प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे पालन करावा लागणार आहे.

आज दुपारी आरोग्य विभागकडून 5200 अहवालचे रिपोर्ट प्राप्त झाले यात 5069 अहवाल निगेटिव्ह आले तर 131 अहवाल पॉझिटिव्ह आले. अंबाजोगाई 09, आष्टी 33, बीड 30, धारुर 07, गेवराई 17, केज 03, माजलगाव 03, परळी 04, पाटोदा 13, शिरुर 05, वडवणी 07 असे रुग्ण जिल्हाभरात आढळुन आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here