आमदार सुरेश धसांचा मोर्चा ठणार निर्णायक!

0
47

मोठ्या सॅख्येने समाज बांधव होणार मोर्चात सहभागी

प्रारंभ वृत्तसेवा

बीड : मराठा आरक्षणासह इतर मागण्यांसाठी आमदार सुरेश धस हे उद्या धडक मोर्चा काढणार आहेत. यामोर्चाची धास्ती आता पासून सरकारने घेतल्याचे दिसते. आमदार सुरेश धस यांच्या पुढाकाराने निघणाऱ्या मोर्चात ठिक ठिकाणाहुन समाज बांधव मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी होणार आहेत. मोर्चाच्या अनुषंगाने जिल्हाभरात होत असलेल्या आढावा बैठकांना भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर मराठा युवकांनमध्ये एक रोष निर्माण झालेला आहे. यासह मराठा समाजाला सध्या विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. गेल्या अनेक वर्षापासून मराठा आरक्षणाचा प्रश्‍न प्रलंबित आहे. यासह इतरही प्रश्‍न प्रलंबित आहेत. परंतु या सर्व प्रश्‍नांकडे सरकार दुर्लक्ष करताना दिसत आहे. सध्या चालेला वेळ काढूपणा युवकांचा डोके दुखीचा विषय बनत आहे. यासह कोव्हीड मध्ये ज्यांनी स्वता:चा जिव धोक्यात घालून काम केले त्या कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांना कायम करण्यात यावे यासह इतर महत्वांच्या प्रश्‍नांसाठी आमदार सुरेश धस यांनी पुढाकार घेतला असून या मागण्या सरकार दरबारी मार्गी लावण्यासाठी उद्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढऱ्यात येणार आहे. हा मोर्चा उद्या सकाळी साडे दहाला शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकातुन निघणार असून सुभाष रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौकातुन जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. मराठा आरक्षण व इतर प्रश्‍नांसाठी उद्याचा मोर्चा हा निर्णायक ठरणार असल्याचे दिसत आहे.

उद्याच्या मोर्चातील प्रमुख मागण्या;

मराठा आरक्षणाचा प्रश्‍न लवकर मार्गी लावावा
पिक कर्ज तातडीने वाटप करण्यात यावे
पिक विम्याच्या बाबतीत बीड पॅटर्न उलटा चाललाय, यात दोषींवर कारवाई करण्यात यावी
उसतोड मजुर, मुकादम यांच्यासाठी कायदा करावा, 66 टक्के भाववाढ द्यावी
कोव्हीड मध्ये काम केलेल्या पात्र आरोग्य कर्मचाऱ्यांना नियुक्ती देण्यात यावी
वाळुघाटावरुन घरकुलांसाठी 6 ब्रास वाळु देण्यात यावी, कोवीड बळीच्या कुटूंबाला आर्थिक मदत द्यावी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here