बीड जिल्ह्याला दिलासा: उद्या पासून जिल्ह्यातील निर्बंध शिथिल

0
84

राञी दहा पर्यंत दुकाना सुरु ठेवण्यास मुभा

प्रारंभ वृत्तसेवा

बीड : राज्य सरकारने दिलेले आदेशानुसार आता बीड जिल्हा सुद्धा उद्या पासून अनलाॅक होत आहे. उद्या (ता. १५) राज्यसह बीड जिल्ह्यातील निर्बंध शिथिल करण्यात आले असून जिल्हाधिकारी यांनी तसे आदेश काढले आहेत. परंतु कोव्हीड नियमांचे पालक बंधनकारक आहे

गेल्या दिड वर्षा पासून जिल्ह्यात कायम असणारे नियम उद्या पासून शिथिल करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी यांनी घेतला आहे. जिल्ह्यातील सर्व दुकाने राञी १०: ०० पर्यंत सुरु ठेवता येणार आहेत. यासह उपहारगृह ५०% क्षमतेने पुर्ण वेळ सुरु ठेवता येणार आहेत. परंतु दुकाने, हाॅटेल यासह इतर ठिकाणी काम करणार्यांना लसीकरण बंधनकारक करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी आज नवे आदेश काढले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here