नागपूर (Nagpur): दि. १/१२/२०२३ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Droupadi Murmu) यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी राजभवन (Raj bhavan) येथे आज भेट घेतली. यावेळी राज्यपाल रमेश बैस (Governor Ramesh Bais) , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Dept. CM Devendra Fadnavis) उपस्थित होते.

नागपूर येथील वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाच्या ( मेडिकल ) अमृत महोत्सवी सोहळ्यावरून परत आल्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू राजभवनात पोहचल्या. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांची सदिच्छा भेट घेतली. मुख्यमंत्री नागपूर येथे आल्यानंतर विमानतळावरून थेट राजभावनात पोहचले. यावेळी त्यांच्यासोबत रामटेकचे खासदार कृपाल तुमाने आमदार अॅड. आशिष जायस्वाल उपस्थित होते.