आज मध्यराञी लाॅकडाऊन उठणार?

0
1795

पण जिल्ह्याची परिस्थिती अत्यंत नाजूक

प्रारंभ वृत्तसेवा

बीड : जिल्ह्यात कोरोना आटोक्यात आणण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी दहा दिवसचे लाॅकडाऊन जिल्ह्यात लागु केले होते. त्याची मुदत आज मध्यराञी संपणार आहे. पण अजुनही जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती नाजूकच आहे. यामुळे जिल्हाधिकारी कोणता निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील कोरोनाचा आकडा वाढत असल्यामुळे जिल्ह्यात विविध कडक निर्बंध लागु केले होते. परंतु त्यांने काहीच फरक पडत नसल्यामुळे २६ मार्च ते ४ एप्रिल पर्यंत जिल्ह्यात लाॅकडाऊनची घोषणा केली होती. आज मध्यराञी या लाॅकडाऊनची मुदत संपत आहे. परंतु अजुनही जिल्ह्यातील परिस्थीती नाजुकच आहे. दिवसाकाठी ३०० ते ४०० नव्या रुग्णांची भर जिल्ह्यात पडत आहे. यामुळे जिल्हाधिकारी परत लाॅकडाऊन लावतात का लाॅकडाऊन उघडतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

परत नो लाॅकडाऊनचा सुर!

जिल्ह्यात परत लाॅकडाऊन लागला तर तो लाॅकडाऊन बीडकरांना न झेपणारा आहे. परंतु रुग्ण संख्या वाढत असल्यामुळे जिल्ह्यात अजुन कडक निर्बंध लावणे गरजेचे आहे. एकीकडे कोरोना तर दुसरीकडे अर्थिक बाजु कमजोर झालेली आहे. यामुळे कशा प्रकारे या संकटाचा सामना करावा हा प्रश्न सध्या बीडकरांना भेडसावत आहे. जिल्ह्यात परत नो लाॅकडाऊनचा सुर निघत आहे…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here