पक्षमर्यादा झिडकारुन द्रोपदी मुर्मु यांना मतदान होईल – आशिष शेलार

0
44

राष्ट्रपती पदासाठी आज मतदान

सध्याचं चित्र पाहता एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांचं पारडं जड

प्रारंभ वृत्तसेवा

मुंबई : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी आज (ता. 18) मतदान होणार आहे. या निवडणूकीत एनडीएकडून द्रौपदी मूर्म आणि युपीएकडून यशवंत सिन्हा निवडणूक लढवत आहेत. पक्षमर्यादा झिडकारुन आज द्रोपदी मुर्मु यांच्या समर्थनात मतदान होईल असे सूचक वक्तव्य भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी केले.

आज सकाळी माध्यमांशी बोलताना भाजप नेते आशिष शेलार म्हणाले की, आम्हाला महाविकास आघाडीचे अस्तित्व दिसत नाही. महाराष्ट्रातून एनडीएच्या उमेदवारास मोठ्या संख्येनं मतदान होईल. तो आणखी एक राजकीय इतिहास ठरणार आहे. राज्यसभा, विधानसभा निवडणूकीत काय झालं ते राज्याने पाहिलं आहे. पक्षमर्यादा झिडकारुन आज द्रोपदी मुर्मु यांच्या समर्थनात मतदान होईल असे सूचक वक्तव्य शेलार यांनी केले.

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. भाजपनं राष्ट्रपतीपदासाठी द्रौपदी मुर्मू यांच्या रुपात आदिवासी चेहरा दिला आहे. राष्ट्रपतीपदासाठी मतदान करणाऱ्या जवळपास 60 टक्के जणांचा द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा आहे. त्यामुळं साहजिकच त्यांचा विजय निश्‍चित मानला जात आहे. आज मतदान झाल्यानंतर निकाल 21 जुलै रोजी जाहीर होणार आहे. त्यानंतर 25 जुलै रोजा नव्या राष्ट्रपतींचा शपथविधी होईल.

असं आहे मतांचं गणित

राष्ट्रपती निवडणुकीत एकूण 4809 मतदार, मतांचं एकूण मूल्य 10 लाख 86 हजार 431

लोकसभा आणि राज्यसभेचे 776 खासदार मतदार, खासदारांच्या मतांचं एकूण मूल्य 5 लाख 43 हजार 200

सर्व राज्यांतील 4033 आमदार मतदार, प्रत्येक राज्यात मतांचं मूल्य वेगवेगळं

विविध राज्यांतील आमदारांच्या मतांचं एकूण मूल्य 5 लाख 43 हजार 231

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here