“मरणाच्या दारावर मोदी सरकार करवसुली करणार,”

0
45

दिल्ली : सोमवारपासून केंद्र सरकारने सर्व सामान्यांना लागणाऱ्या साहित्यांवर जीएसटी लावला आहे. यामुळे पहिलेच महागाई त्यात जीएसटीमुळे भर पडणार आहेत. जीएसटीवरुन शिवसेनेनं केंद्रातील सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलं आहे. एकीकडे कॉर्परेट टॅक्ससारख्या गोष्टींमध्ये सूट देऊन उद्योजकांना सवलत देता आणि दुसरीकडे गोरगरीब जनतेच्या अन्नधान्यावर व दह्यावर जीएसटी लादून ते महाग करता, हा कुठला कारभार म्हणायचा? असा प्रश्‍न शिवसेनेनं विचारलाय. स्मशानातील विधी व साहित्य यांवरही आता 12 टक्क्यांऐवजी 18 टक्के जीएसटी आकारला जाणार असल्याच्या मुद्द्यावरुन, “मरणाच्या दारावर मोदी सरकार करवसुली करणार,” असा टोला लगावलाय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here