आज राञी आठ पासून जिल्ह्यात दोन दिवसाचे कडक लॉकडाऊन

0
1651

अत्यावश्‍यक सेवा सोडता सर्व राहणार बंद

प्रारंभ । वृत्तसेवा

बीड : राज्य सरकारने 30 एप्रिलपर्यंत राज्यात कडक निर्बंध लागू केले असून त्यात विकेंड लॉकडाऊन घोषित केला आहे. यामुळे आज रात्री आठ पासून दोन दिवस शनिवार आणि रविवारी राज्यासह बीड जिल्ह्यात कडक लॉकडाऊन असणार आहे. यात अत्यावश्‍यक सेवांना सूट देण्यात आली आहे.
राज्यात कोरोनाचा आकडा वाढत असल्यामुळे राज्य सरकारने कडक निर्बंध लावण्यास सुरुवात केली असून 30 एप्रिलपर्यंत राज्यात विविध नियम लागू केले आहेत. यात विकेंड लॉकडाऊन हा सुद्धा निर्णय घेण्यात आलेला असून आज रात्रीपासून राज्यात शनिवार, रविवार हे दोन दिवस कडकडीत बंद पाळण्याच्या सुचना राज्यातील सर्व जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. या निर्णयाची अमलबजावणी जिल्ह्यात सुद्धा होणार आहे. यामुळे शनिवार, रविवार अत्यावश्‍यक सेवा सोडता सर्व बंद असणार असून या दोन दिवसात कोरोनाची साखळी तोडण्यात किती यश येते हे यात समजेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here