दिवसभरात राज्यात ५५ हजार ४११ नव्या रुग्णांची भर!

0
236

दिलासादायक म्हणजे ५३ हजार रुग्णांनी आज कोरोनावर मात केली

प्रारंभ वृत्तसेवा

बीड : इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात कोरोना रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. आज राज्यात ५५ हजार ४११ नव्या रुग्णांची भर पडली. ही बाब जरी गंभीर असली तरी आज दिवसभरात ५३ हजार रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

राज्यात आज ५५ हजार ४११ रुग्ण वाढले तर ३०९ रुग्णांचा बळी गेला. राज्यात आजपर्यंत एकूण ५ लाख ३६ हजार ६८२ अॅक्टीव्ह रुग्ण आहेत. यामुळे राज्याची चिंता वाढताना दिसत आहे. रुग्ण जर असेच वाढत गेले तर राज्यातील परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता असल्यामुळे उद्या मुख्यमंञी कठोर निर्णय घेण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here