डोळा मारणं, फ्लाईंग किस करणं लैगिंक छळच!

0
949

पोस्को कायद्यांतर्गत आरोपीला १ वर्षाची शिक्षा ; कोर्टाने सुनावली शिक्षा

प्रारंभ वृत्तसेवा

बीड :  एका २० वर्षीय आरोपीला अल्पवयीन मुलीला डोळा मारणे आणि फ्लाईंग किस केल्याप्रकरणी मुंबईतील एका कोर्टाने  एका वर्षाची शिक्षा सुनावली आहे. लैंगिक गुन्हा बाल संरक्षण कायदा म्हणजेच ‘पोस्को’ अंतर्गत कोर्टाने हा निकाल दिला आहे. आरोपीला एका वर्षाची शिक्षा आणि १५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. आरोपीला शिक्षा सुनावताना डोळा मारणे आणि फ्लाईंग किस करणे म्हणजेच लैंगिक छळ असल्याचं मतही कोर्टाने नोंदवलं आहे.

२९ फेब्रुवारी २०२० रोजी १४ वर्षीय पीडित मुलगी आपल्या बहिणीसोबत घराबाहेर जात असताना आरोपीने तिला डोळा मारला आणि फ्लाईंग किस केलं. आरोपीच्या कृत्यामुळे १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी मानसिक तणावात होती. या घटनेनंतर पीडित तरुणीच्या कुटुंबियांनी एलटी मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला बेड्या ठोकल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here