ज्या घरातून लग्नाची वरात निघणार होती त्या घरातून निघाली आईवडिलांची अंत्ययात्रा!

0
1696

प्रारंभ वृत्तसेवा

नवी दिल्ली- संपूर्ण देशात कोरोना महामारीमुळे परिस्थिती गंभीर होत चालली आहे. हजारोच्या संख्येने लोकांचे जीव जात आहेत. कधी कुटुंबातील कर्ता सदस्य कोरोनामुळे जीव गमावतोय तर कधी संपूर्ण कुटुंब कोरोनामुळे उध्वस्त झाल्याचे पाहायला मिळत आहे. अशीच एक धक्कादायक घटना

उत्तर प्रदेशच्या बरेलीमध्ये घडली आहे. हसत्या खेळत्या घराला कोरोनाने विळखा घातला व दोन कर्त्या माणसांचा जीव घेतला आहे.

७ एप्रिल रोजी शर्मा आणि त्यांच्या पत्नीमध्ये कोरोनाची काही लक्षणं आढळून आली आहेत. त्यानंतर त्यांच्यावर कोरोना रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान १३ एप्रिल रोजी ऑक्सिजन लेव्हल कमी झालेली असतानाच पत्नीचा मृत्यू झाला तर त्यानंतर १६ एप्रिलला पतीचा देखील मृत्यू झाला. ज्या घरातून वरात निघणार होती त्या घरातून अंत्ययात्रा निघाल्याने सर्वांनाच खूप मोठा धक्का बसला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

२ मे रोजी मुलीचं लग्न असल्याने सर्व कुटुंब खूप आनंदी होतं. तयारी सुरू होती. मात्र या घटनेनंतर संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here