टीईटी घोटाळ्यातील शिक्षकांचे नावे जाहीर करा – मनोज जाधव

0
27

टीईटी घोटाळ्यात बीड जिल्ह्यातील नेमके किती शिक्षक

जिल्हा परिषदे कडून नावे जाहीर करण्यासाठी विलंब का?

बीड (प्रतिनिधी) सर्व महाराष्ट्र टीईटी घोटाळ्याने हादरला असताना आता बीड जिल्ह्यात किती बोगस उमेदवार आहेत यांची चर्चा जोरात सुरू असताना बीड शिक्षण विभागा कडून मात्र अद्याप या शिक्षकांचे नावे जाहीर करण्यात आली नाहीत राज्यात येवढा मोठा घोटाळा झाला असल्याने जे प्रमाणिक पने उतिर्न होऊन आपले कर्तव्य बजावत आहेत त्या शिक्षका कडे देखील लोक संशयाच्या नजरेने पहात आहेत त्यामुळे शिक्षण विभागाने लवकरात लवकर बोगस टीईटी प्रमाणपत्र धारक शिक्षकांची यादी जाहीर करावी अशी मागणी शिवसंग्राम चे युवा नेते तथा आरटीई कार्यकर्ते मनोज जाधव यांनी केली आहे.

गेल्या दोन वर्षापासून राज्यात शिक्षण क्षेत्रात गाजत असलेल्या टीईटी घोटाळ्यामुळे पुणे सायबर क्राईम शाखेने तपास पूर्ण केल्यानंतर यामध्ये जवळपास ७८८० शिक्षकांनी बोगस टीईटी प्रमाणपत्र घेतल्याचे स्पष्ट झाल्याने या सर्व शिक्षकांवर अपात्रतेची कारवाई करत त्यांना टर्मिनेट करण्यात आले आहे .एकाचवेळी सात हजारपेक्षा जास्त शिक्षक नौकरीवरून काढण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेने घेतला असून यामुळे शिक्षण विभागात मोठी खळबळ माजली आहे . या घोटाळ्यामुळे अनेक शिक्षक संघटनांचे पदाधिकारी , शिक्षण संस्थांचे पदाधिकारी यांचाही समावेश असल्याचे बोलले जात आहे . दरम्यान या घोटाळ्यात बीड जिल्ह्यातील माध्यमिक विभागातील आणि प्राथमिक विभागातील किती शिक्षक बोगस प्रमाणपत्र धारक आहेत हे एकदा शिक्षण विभागाने जाहीर करून दूध का दूध पाणी का पाणी करावे असे मत मनोज जाधव यांनी व्यक्त केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here