एकनाथ शिंदे आमचे मुख्यमंत्री आहेत मी त्यांच्या पाठीशी आहे – देवेंद्र फडणवीस.

0
31
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस .
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस .

मुंबई (Mumbai) : मी पुन्हा येणार हे ट्विट व्हायरल झाल्यानंतर भाजपने ५५ मिनिटात ते डिलिट केले. या ट्विट ची चर्चा राजकीय वर्तुळात इतकी रंगली की खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Dept. CM Devendra Fadnavis) यांना याबाबतचा खुलासा करावा लागला. एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आमचे मुख्यमंत्री आहेत. मी त्यांच्या पाठीशी आहे, असे त्यांना पुन्हा एकदा म्हणावे लागले.

– मुंबईत पत्रकारांशी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार (Sharad Pawar)  यांच्यात हाच फरक आहे. एकनाथ शिंदे आमचे मुख्यमंत्री आहेत मी त्यांच्या पाठीशी आहे आणि त्यांच्याच पाठिशी राहणार.
एखाद्याला यायचं असेल तर तो व्हीडीओ टाकून येतो का? असा सवाल उपस्थित करत ते म्हणाले, किती वेडेपणा आहे, डोके ठिकाणावर असले पाहिजे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांचा कार्यकाळ पूर्ण करतील, एकही दिवस कमी नाही. ते मुख्यमंत्री असताना त्यांच्याच नेतृत्वाखाली निवडणुका होतील. एखाद्या व्हिडिओचा अर्थ लावणे चुकीचे आहे.

शरद पवार यांच्यासंदर्भात बोलताना ते म्हणाले, ज्यांच्या नेतृत्वाखाली ३०५ खासदार निवडून येतात त्यांनी ज्यांच्या नेतृत्वाखाली फक्त चार खासदार निवडून येतात, त्यांचा धसका घेतला हे बोलणं हास्यास्पद आहे.
शरद पवारांची पत्रकार परिषद मी ऐकली नाही, त्यामुळे त्याच्यावर मी कुठली प्रतिक्रिया देणार नाही, असे फडणवीस म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here