जिल्हाधिकारी यांच्या प्रयत्नांमुळे पवार कुटूंबाला मिळणार घर

0
27

बीडच्या इंजिनिअर विद्यार्थ्यांचा अमृतसरमध्ये मृत्यू

-जिल्हाधिकारी शर्मांच्या प्रयत्नामुळे मृतदेह बीडमध्ये आणला!

प्रारंभ वृत्तसेवा

बीड :  येथील आदित्य कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयातील बी.टेक ॲग्री इंजिनिअरच्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याचा अमृतसरमध्ये शनिवारी (ता. तीन)  मृत्यू झाल्याची घटना घडली होती. याची माहिती मिळताच  जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी तत्परता दाखवत अमृतसर, नांदेड येथील जिल्हाधिकान्यांशी संपर्क केला. रेल्वेने मृतदेह आणण्यास उशिर लागणार असल्याने जिल्हाधिकारी शर्मा यांनी अमृतसर येथील इतर वरीष्ठ अधिकान्यांशी संपर्क करून विमानाने त्या विद्यार्थ्याचा मृतदेह बीडमध्ये आणला. तसेज जिल्हाधिकारी यांच्या विशेष प्रयत्नांमुळे आप्पाराव पवार यांच्या कुटूंबाला लवकरच घर मिळणार आहे. आप्पाराव पवार यांच्या मृत्यूनंतर जिल्हाधिकारी यांच्या बद्दल उलटसुलट चर्चा होत होती. परंतू जिल्हाधिकारी यांनी पवार कुटूंबाला घर उपलब्ध करुन देण्यासाठी दाखवलेली सकारात्मक भुमिका व अमृतरसमधील युवकाचा मृतदेह आणण्यासाठी केलेले विशेष प्रयत्न यामुळे जिल्हाधिकारी यांचे काम त्यांच्या कार्यातुन दिसले.

जिल्हाधिकारी यांच्या हलगर्जीपणामुळे आप्पाराव पवार यांचा मृत्यू झाल्याचे आरोप झाल्यानंतर जिल्हाधिकारी शर्मा यांच्यावर गुन्हे नोंद करण्याची भुमिका अनेकांनी घेतली होती. परंतू जिल्हाधिकारी यांनी पुर्वी पासून आप्पाराव पवार यांना न्याय देण्याची भुमिका घेतली असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाने स्पष्ट केले होते. यानंतर जिल्हाधिकारी यांनी आप्पाराव पवार यांचे कुटूंब व काही संघटनांशी बैठक घेऊन यात तोडगा काढण्यासाठी सकारात्मक पुढाकार घेतला प्रयत्न. या बैठकीला जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, मुख्यकार्यकारी अधिकारी अजित पवार, पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुरेश साबळे यांच्यासह पवार कुटूंब व काही संघटना उपस्थित होत्या. या बैठकीत पवार कुटूंबाला लवकरात लवकर घर देण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी दाखवलेली सकारात्मक भुमिका सर्वांना योग्य वाटली व यात तोडगा काढून आप्पाराव पवार यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. लवकरच पवार कुटूंबाला घर मिळणार आहे. यासह अमृतसर मध्ये बीड मधील एका युवकांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हाधिकारी यांना मिळाल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी तेथील अधिकाऱ्यांशी संपर्क करुन अविनाश बेदरेचा मृतदेह बीड मध्ये आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले.  केज तालुक्यातील कोरडेवाडी येथील अविनाश अनिल बेदरे हा युवक  बीड येथील आदित्य कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयात तृतीय वर्षात शिक्षण घेत होता.  28 नोव्हेंबर रोजी 2022 रोजी ट्रेनिंगसाठी हरीयाणा येथे गेला होता. शनिवार, रविवार सुट्टी असल्याने परवानगी घेवुन तो दि. 2 डिसेंबर रोजी अमृतसरा गेला होता. परत येताने दि. 3 डिसेंबर रोजी  रेल्वे स्टेशनवरून रेल्वे चालली म्हणून तो जोरात रेल्वे पकडण्यासाठी पळत गेला. मात्र धाप भरल्याने चक्कर येवुन जागीच पडला. त्याला तात्काळ जवळच्याच सिध्दी हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी करून एसीजी काढून अविनाशला मृत घोषीत केले. रेल्वे पोलीसांनी त्याचा मृतदेह ताब्यात घेवुन आधारकार्ड वरील पत्त्यानुसार वीड जिल्हा प्रशासनाशी संपर्क केला. जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी तात्काळ अमृतसर येथील जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क केला. त्यानंतर नांदेड जिल्हाधिकाऱ्यांना बोलले. सुरवातीला रेल्वेतुन मृतदेह आणण्याचा प्रयत्न सुरू होता, मात्र त्यास तीन दिवस लागणार असल्याने जिल्हाधिकारी शर्मा यांनी पुन्हा अमृतसर येथील वरीष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क करून अविनाशचा मृतदेह विमानाने औरंगाबादला आणण्यासाठी प्रयत्न केले. औरंगाबाद येथून वाहनांने अविनाशचा मृतदेह गावी आणण्यात आला.

जिल्हा प्रशासन सर्वसामान्यांसाठी तत्पर – जिल्हाधिकारी

आप्पाराव पवार यांचा मृत्यू दुर्दैवी असून पवार कुटूंबाला लवकरात लवकर घर मिळून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असून लवकरच पवार कुटूंबाला घर देऊत. येथील अविनाश बेदरेचा मृत्यू अमृतसर येथे झाल्याची माहिती मिळताच आम्ही तेथील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क करुन मृतदेह बीड ला आणण्यासाठी सकारात्मक भुमिका घेतली. मी स्वत: तेथील पंधरा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी बोलून यातुन मार्ग काढला. संबंधित ठिकाणच्या जिल्हाधिकारी यांनी सुद्धा यात मदत केल्यामुळे अविनाशचा मृतदेह औरंगाबाद पर्यंत विमाने आणण्यात आला व तेथून वाहनाने बीडला आणला. बीड जिल्ह्यातील सर्वसामान्यांचे प्रश्‍न सोडवण्यासाठी जिल्हा प्रशासन तत्पर असल्याचे मत जिल्हाधिकारी यांनी प्रारंभशी  बोलताना व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here