जरांगे पाटलांनी आपल्या मागणीचा पुनर्विचार करावा.

0
31
मनोज जरांगे.
मनोज जरांगे.

बबनराव तायवाडे यांची प्रतिक्रिया.

नागपूर (Nagpur): सध्या मराठा आरक्षणासाठी (Maratha Aarakshan) सुरू असलेले आरक्षण आणि सरकारची भूमिका यावर राष्ट्रीय ओबीसी (OBC) महासंघाचे बबनराव तायवाडे (Babanrao Taywade) यांनी प्रतिक्रिया दिली.
ते म्हणाले, सरकारने आज भुमिका मांडली, नियमाला अधीन राहून 11 हजार 300 नोंदी मिळाल्यात, उद्याच्या कॅबिनेटमध्ये निर्णय घेऊन कुणबी प्रमाणपत्र देणार असल्याचं सांगितलं.
सरकार महसूल अधिकाऱ्यांना मराठा कुणबी पत्र देण्याचे आदेश देणार आहे.
ओबीसीत इतर जातीच्या लोकांना कागदपत्र मिळत नाही त्यांच्यासाठी कागपत्र तपासून ओबीसी प्रमाणपत्र देण्यात यावे याचा निर्णयाचे स्वागत करतो, असेही ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले, सरकार आरक्षण देण्याचा प्रयत्न करण्यासाठी कटीबध्द आहे, यात मराठा समाज मागासलेला आहे, त्यामुळे त्यांना आरक्षण द्यावे. सरसकट सर्वाना कुणबी प्रमाणपत्र देऊ शकत नाही हे सरकारने स्पष्ट केलं आहे.
आंदोलकांनी उग्र आंदोलन करून नुकसान करणे योग्य नाही, आज सामान्य माणूस सोबत आहे, पण अश्या पद्धतीने नुकसान होणार असेल तर सामान्य माणूस आंदोलनकर्त्याचा विरोध करायला सुरुवात करेल.
ज्यांच्या नोंदी आहेत त्यांना कुणबी प्रमाणपत्र देणार, त्यामुळे सरकारची बाजू स्पष्ट झाली, ओबीसी आंदोलनकर्त्यांनी संविधानाला धरून मागणी केली होती. त्यामुळे मराठा आंदोलकांनी थांबलं पाहिजे, यात आंदोलनकर्त्यांनी विचार करावा, न्याय पालिकेत मोठे तज्ज्ञ सांगत आहे, की ओबीसीतून आरक्षण देता येणार नाही. जरांगें सारखे समाजाला लाभणारे योद्धा कमी आहेत, त्यांनी मागणी बदलावी आम्ही सोबत राहू. त्यांनी प्रकृतीची काळजी घ्यावी. जरांगे यांनी केलेली मागणी आज तळागाळात पोहचली, ती मागणी कायदेशीर आहे की नाही हे मराठा समजातील जनतेला माहीत नाही. त्यामुळे आंदोलनकर्त्यांनी याचा विचार करावा. जरांगे पाटील मागणी बदलत नाही तोपर्यंत यातून मार्ग निघणार नाही मुख्यमंत्री यांनी जरांगेंना विनंती केली. आम्हीही विनंती करतो,जरांगे पाटलांनी आपल्या मागणीचा पुनर्विचार करावा आणि समाजाला शांत करावे.
– या आंदोलना मागे जर कोणी राजकीय हेतू असेल यात आश्चर्य वाटण्यासारख काही नाही, असेही तायवाडे म्हणाले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here